साहित्यिकांना हवी विधान परिषदेत संधीसाहित्यिकांना हवी विधान परिषदेत संधीसरकारनामा ब्युरो नागपूर, ता. 16 ः विधान परिषदेमध्ये साहित्य-कला-विज्ञान या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा निवड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या निर्देशांचा "अभ्यास' करावा, अशी सूचना अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने केली आहे. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने मुख्यमंत्र्यांना "अभ्यासा'साठी आणखी एक विषय उपलब्ध करून दिला आहे. विधान परिषदेमध्ये 12 जागांवर साहित्य-कला-विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची राज्यपालांनी नियुक्ती करावी, अशी मागणी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने थेट राज्यपालांकडे केली आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या निर्देशाप्रमाणे विधान परिषदेमध्ये राज्यपालांच्या संमतीने 12 जणांची नियुक्ती करण्यात येते. या 12 जणांमध्ये राज्यातील साहित्य-कला-विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींची निवड करावी, असे निर्देश आहेत. या निर्देशानुसारच ना. धों. महानोर, रामदास फुटाणे, शांताराम नांदगावकर, लक्ष्मण माने यांना विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले होते. गेल्या काही वर्षांपासून मात्र या क्षेत्रावर राजकारण्यांनी आक्रमण केले आहे. राज्य सरकारतर्फे या 12 जणांमध्ये सत्तारुढ पक्षाच्या पराभूत किंवा वजनदार नेत्यांची निवड होताना दिसून येत आहे. राज्यपालांतर्फे विधान परिषदेमध्ये नेत्यांची होणारी नियुक्ती राज्यघटनेच्या निर्देशांच्या विरोधात असल्याचे अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राची राज्यपाल व मुख्यमंत्री कार्यालयांनी कोणतीही दखल न घेतल्याने मराठी साहित्य महामंडळातर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या जनहित याचिकेवर अद्यापही उच्च न्यायालयाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. डोंबिवली येथे गेल्या वर्षी झालेल्या 90 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनातही ठराव संमत केला होता. या ठरावावरही राज्य सरकारने कोणतेही उत्तर न देता ठराव नस्तीत ठेवला आहे. साहित्य-कला-विज्ञान क्षेत्राच्या प्रगतीसाठी याक्षेत्रातील व्यक्तींची निवड विधान परिषदेत होण्याची आवश्यकता असल्याचे पत्रात म्हटले आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी साहित्य-कला-विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची नावे प्रस्तावामध्ये नसल्याने उत्तरप्रदेश सरकारचा प्रस्ताव परत पाठविला होता, असा दाखलाही या पत्रात दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या निर्देशांचा "अभ्यास' करावा, असेही श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सुचविले आहे. | |||
शुक्रवार, १६ जून, २०१७
५:३८ AM
sureshbusari
No comments
शुक्रवार, २ जून, २०१७
६:३४ AM
sureshbusari
No comments
कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी सरकारनामा ब्युरो नागपूर, ता. 2 ः शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामागे विरोधकांची फूस असल्याचे वक्तव्य करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्री असंवेदनशील वक्तव्य करीत असल्याने सरकारवर भादंविअंतर्गत 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली. गेल्या 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. शेतकरी भाजपाला व दूध रस्त्यांवर फेकून सरकारच्या धोरणांचा निषेध करीत आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना वडेट्टीवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकारवर भादंविच्या कलम 302 अंतर्गत खुनाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत होते. आता ते सत्तेत आहेत. त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या तर नाही उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांची स्थिती अधिक खालावली आहे. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दुर्दैवी असून घर फिरले की, घराचे वासेही फिरतात. त्याचप्रमाणे या सरकारचे डोके फिरले आहे, असा टोमणाही वडेट्टीवार यांनी मारला. भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी यांच्या अकलेचे दिवाळे निघाले असून भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज आल्याचे वडेट्टीवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. शेतकऱ्यांच्या संपावर गेल्याने काहीही फरक पडत नाही, असे वक्तव्य भंडारी यांनी केले होते. | |||
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)

