बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

फोटो-
चव्हाण, राणे, विखे पाटलांनी कॉंग्रेस बुडविली
माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवारांचा हल्लाबोल
अखंड महाराष्ट्राच्या ठरावाला विरोध
सेनेसोबत जाण्याची अवदसा कां सुचली?
सरकार ब्युरो
नागपूर, ता. 2 ः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे व राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेस बुडविली आहे. शिवसेनेशी संगनमत करून अखंड महाराष्ट्राचा ठराव आणण्याचा घाट घालणाऱ्या नेत्यांची कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात येईल, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी कॉंग्रेस नेत्यांवर तोफ डागली.
अखंड महाराष्ट्राचा ठराव आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेचे सहाय्य मागितले होते. हा प्रकार पक्षविरोधी असल्याचा आरोप करून मुत्तेमवार यांनी या वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांवर हल्ला चढविला. मुत्तेमवार यांच्यासोबत माजी मंत्री डॉ. नितीन राऊत व डॉ. सतीश चतुर्वेदी होते. या तीन नेत्यांनी चव्हाण, राणे, विखे पाटलांवर विखारी शब्दात टीका केली. शिवसेना हा जातीयवादी पक्ष आहे. या पक्षासोबत संगनमत करून ठराव आणण्याची अवदसा या नेत्यांना कां सुचावी, असा सवाल करून मुत्तेमवार म्हणाले, कॉंग्रेसच्या या नेत्यांना सत्तेची हाव सुटली आहे. कसेही करून सत्तेचे स्वप्न पाहत आहेत. राणे व विखे पाटलांचा इतिहास साऱ्या महाराष्ट्राला अवगत आहे. सत्तेसाठी कोणत्याही पक्षात जायला ते तयार राहतात. त्यांनी पक्षनिष्ठेच्या गोष्टी आम्हाला सांगू नये. अखंड महाराष्ट्राचा ठराव आणण्यासाठी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठीची परवानगी होती काय? अशी विचारणा करून स्वनामधन्य या पुढाऱ्यांची तक्रार सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधींकडे केली जाणार आहे.
कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात विदर्भाचा मुद्दा नसल्याचे मान्य करून ते म्हणाले, आम्ही सत्तेत असतानाही विदर्भाची मागणी केली आहे. त्यावेळी पक्षश्रेष्ठीने कधीही हरकत घेतली नाही. यामुळे कॉंग्रेस विदर्भ विरोधी नाही. याउलट प्रणव मुखर्जी समितीने स्वतंत्र विदर्भाची शिफारस केली आहे, असेही मुत्तेमवार यांनी स्पष्ट केले.

बॉक्‍स..
फडणवीसांनी सरड्याला हरविले
रंग बदलण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरड्यालाही हरविल्याची टिप्पणी मुत्तेमवार यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी निवडून आल्याबरोबर वेगळ्या विदर्भाचे राज्य केले जाईल, असे आश्‍वासन विदर्भाच्या जनतेला दिले होते. त्या भरवशावर भाजपचे 44 आमदार निवडून आले होते. सत्ता मिळाल्याबरोबर फडणवीसांनी रंग बदलला. त्यांनाही मुंबईची चटक लागल्याचा आरोप मुत्तेमवार यांनी केला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Unordered List

Sample Text

Blogger द्वारे प्रायोजित.

Social Icons

Followers

Popular Posts

Featured Posts

Popular Posts

Recent Posts

Text Widget